कायं मिळालं? | Emotional Marathi Story

Emotional Marathi Story- ही कथा आहे आई बाबांची जे आयुष्यभर मुलांसाठी खूप काही करतात पण त्यांना कायं मिळालं?

एका गावात एका छोट्याश्या घरात एक जोडपे राहत असतं. लग्नाला एक दोन वर्ष झालेली असतात. त्यांना खूप सुंदर गोंडस मुलगी होते. पण घरचांच्या अपेक्षा असतात घराण्याला वारस पाहिजे. घराला वारस पाहिजे म्हणून एका पाठोपाठ परत दोन मुली होतात त्यानंतर मुलगा होतो. तरीही घरचे आणखी एका मुलग्याची अपेक्षा करतात आणि पाचवी मुलगीचं होते.

तरीही ते दोघे पाच मुले आहेत कसं त्यांना वाढवायचं, कसं सांभाळायचं, शिक्षण कसं द्यायचं याचा कोणताचं विचार करत रडत बसतं नाहीत. त्यांना फक्त एवढचं माहिती होतं त्यांना चांगलं आयुष्य, चांगले संस्कार आणि या जगात स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं.

ते दोघेही आपले प्रयत्न सोडत नाहीत. दोघे पण दररोज भाजी विकून आपल्या पाच मुलांचे पोट भरत असतं. दिवस रात्र एक करायचे, कधी कधी स्वतः उपाशी राहून मुलांसाठी पोटाला चिमठा लावून दिवसभर उन्हात भाजी विकायचे. पण मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे.मुले हळू हळू मोठी होतं गेली तस तसे त्यांचे खर्च वाढत गेले. दररोज दोघे जण भाजी विकायचे पण जेवढे मुलांना वाढवण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पुरतं नसतं.

हळू हळू खर्च वाढत गेला आणि मग त्यांनी नाईलाजास्तव पैसे व्याजाने घेतले आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करत गेले. पण मुलांचे शिक्षण, घरातला खर्च यामुळे व्याजाचे पैसे फेडू शकले नाहीत. व्याजावर व्याज वाढत गेलं. मोठी मुलगी आता लग्नाची झाली होती. तिला स्थळ येतं होतीत मग एक दिवस असचं तिला खूप चांगले स्थळ आले आणि लग्न ठरलं. लग्नाचे दिवस जवळ येतं होते पण हातात मात्र लग्नासाठी पैसे नव्हते.

मुलीच्या लग्नासाठी परत पैसे व्याजाने घेतात आणि लग्न करतात. त्यानंतर दुसरी मुलगी सुद्धा पाठोपाठ लग्नाची होते तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे सुद्धा लग्न होते. आणि ज्या महिन्यात दुसऱ्या मुलीचे लग्न झालेले असते त्याच दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या मुलीचे सुद्धा लग्न होते. अशा प्रकारे तिघींची लग्ने होतात पण ते दोघे व्याजाने बुडून जातात.

काही वर्ष निघून जातात.मोठया मुलीला मुलगी असते. मुलग्याचे सुद्धा शिक्षण पूर्ण होते आणि त्याचे लग्न करून सून घरी येते. तरीही त्या दोघांचे कष्ट काही सुटत नाहीत आयुष्यभर राबत राहतात. मुलग्याच्या लग्नाला सुद्धा काही वर्ष होतात. तिघींची बाळतपणं करतात. सुनेची पण करतात चौघानाही मुलीचं होतात. फक्त शेवटच्या मुलीचे शिक्षण बाकी असते. एवढं सगळं होतं असतांना ते दोघे स्वतः साठी जगतंच नाहीत.

सगळे आयुष्य मुलांसाठी त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वतःच्या पायावर उभे करण्यात घालवतात पण एक दिवस असा येतो की जेंव्हा त्यांना हे सगळं काही करत असताना व्याजाने घेतल्याला पैशांची परत फेड करायची असते त्यावेळी कोणी सुद्धा साथ देत नाही. त्यांना असं बोललं जात की तुम्ही तुमचे कर्तव्य केले आहे. आमच्या साठी कायं केलात आम्ही सांगितलं नव्हतं जन्माला घालायला तुम्ही कर्ज केलंय तुम्ही फेडा मग तुम्हीच सांगा कायं मिळालं त्या दोघांना?

लहानाचे मोठे करून तळ हातावरच्या फोडा सारखे जपून, स्वतःच्या पायावर उभे करून, संसाराची घडी बसवून म्हाताऱ्या वयात कोणाची साथ मिळाली. अजूनही ते दोघे लोकांचे कर्ज फेडण्यासाठी कष्ट करतात होतं नाही तरी आजही रोज भाजी विकायला जातात का? कशासाठी तर मुलांसाठी कर्तव्य केलं होतं म्हणून आणि शेवटी त्यांना कायं मिळालं?

म्हणूनचं मला तुम्हाला आज या कथेतून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आई बाबांना तुमचे कर्तव्य म्हणून तरी सांभाळा त्यांना अशा मरण यातना देऊ नका.🙏धन्यवाद..

-पूजा भोसले

अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी (Emotional Marathi Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

Also Read Emotional Marathi Story

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.