तुझ्यासारखं कोणी नाही | Marathi Love Story

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा अनुभव देणारे हे पहिले प्रेम असते.पहिलं प्रेम आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसांपैकी एक असतं.परंतु खूप कमी लोकांच्या नशिबात पहिलं प्रेम हेचं शेवटचं प्रेम असतं. नाहीतर बऱ्याचं जणांचं प्रेम हे अधुरच राहतं.अशीच अमन आणि आरती ची कहाणी आहे अमन बारावीत होता आणि आरती अकरावीला दोघे पण एकमेकांना खूप आवडायचे पण कोणाचीच हिम्मत नाही झाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून सांगायची.दोघांच्या डोळ्यात साफ साफ दिसत होतं दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे.

दोघांची भेट कॉलेजच्या गेट जवळ नेहमी होतं होती दोघेजण एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायचे.कॉलेजला काहीदिवस सुट्टी होती तेंव्हा अमनला आरतीची खूप आठवणं येतं होती पण आरतीशी बोलणार कसं कारण अमन कडे तिचा नंबर नव्हता,तिचं घर,संपूर्ण नाव सुद्धा माहित नव्हतं. अमन खूप उदास होता.

तर दुसरीकडे आरती सुद्धा त्याला भेटण्यासाठी सुट्टी संपण्याची वार बघत होती.काही दिवसांनी कॉलेजच्या सुट्या संपल्या. त्याला खूप आनंद होतो करण आज तो आरतीला भेटणार होता. मस्त रेड़ी होतो आणि कॉलेजला जातो कॉलेजच्या गेट जवळ तिची वाट पाहत थांबतो.बराच वेळ होतो पण ती काही येतं नाही लेक्चर चालू होतात म्हणून तो उदास चेहऱ्याने क्लास मध्ये जातो त्याचं मन कशातच लागत नाही.काय झालं असेल आज कॉलेजचा पहिला दिवस आहे का आली नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात.

प्रॅक्टिकल साठी सर्वाना लॅब मध्ये घेऊन जातात तेंव्हा तिथे त्याला आरती दिसते. आरतीला पाहुण त्याला खुप आनंद होतो. त्याला समजलं आरतीला आज वेळ झाला आहे म्हणून बऱ्याच वेळानंतर दोघे एमेकांसमोर येतात. पण काहीच बोलत नाहीत असाच बराच वेळ निघून जातो त्यानंतर सगळेजण आपापल्या क्लासमध्ये जातात थोड्या वेळानंतर मधली जेवणाची सुट्टी होते त्यावेळेस तिच्या क्लासमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण हे सगळं करत असताना तो स्वतःचा टिफिन खायचा विसरूनचं जातो. क्लासच्या बाहेर गिरट्या मारतच राहतो जेव्हा आरती त्याला एकटी दिसते त्यावेळेस तिला जाऊन सांगतो की कॉलेजच्या बाहेर बस स्टॉप आहे तिथे कॉलेज सुटल्यानंतर थोडा वेळ थांब प्लीज.

आरती ठीक आहे म्हणते दोघेपण कॉलेज सुटण्याची वाट बघू लागतात आरतीच्या मनात अनेक प्रश्न येऊन जातात की आम्ही भेटल्यानंतर अमनशी काय बोलायचं तो काय बोलेल याचा ती विचार करू लागते थोड्या वेळानंतर कॉलेज सुटतं सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात अमन आणि आरती सुद्धा कॉलेजच्या बाहेर पडतात आणि बस स्टॉप वर भेटतात त्यावेळेस दोघांनाही समजत नाही की काय बोलावं दोघांचं सुद्धा हृदय धडधड करत होतं.अमनच धाडस करून तिला विचारतो आज तुला कॉलेजला यायला एवढा उशीर का झाला मी तुझी गेट जवळ खूप वाट बघत होतो.

आरती बोलते आज माझी बस चुकली म्हणून मला यायला खूप उशीर झाला कॉलेजला.दोघांमध्ये बराच वेळ गप्पा चालतात त्यानंतर मला जर तुझ्याशी बोलायचं असेल तर कसं बोलणार तुझा नंबर दे ना मला आरती बोलते तुला माझी असं काय बोलायचं आहे मी नंबर नाही देऊ शकत तेवढ्यात आरतीची बस येते आणि आरती त्याला बाय बोलून बस मधून निघून जाते.

अमन बराच वेळ बस स्टॉप वर तसाच उभे राहून असतो आरती तर बोलायची इच्छा झाली तर आरतीशी बोलायचं कसं तिच्यासोबत कसा संपर्क साधायचा याचाच विचार करत तो घरी निघून जातो. अमनला आरतीची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे आरतीला सुद्धा अमनची खूप आठवण येत असते.तिला बस स्टॉप बोललेल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या पहिल्यांदाच आरती आणि अमन एकमेकांशी बोलले होते आरती त्या सगळ्या गोष्टी आठवून एकटीच खूप हसत होती.

दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट होते दोघेपण एकमेकांना बघून खूप आनंदी होतात असेच कितीतरी दिवस चालू राहतं दररोज त्यांची भेट प्रॅक्टिकलच्या वेळेस लॅब मध्ये आणि कॉलेजच्या गेटवर तसेच बस स्टॉपवर नेहमीच होत राहते. अमन एक दिवस विचार करतो असंच किती दिवस चालणार आता आरतीला मनातली गोष्ट सांगितलीच पाहिजे.दुसऱ्या दिवशी परत दोघे पण बस स्टॉप वर भेटतात अमन खूप हिम्मत करून तिला विचारायचं धाडस करतो पण आरती तर परीक्षेबद्दल बोलत होती त्यामुळे त्याला समजतच नाही काय बोललं पाहिजे.तिचं बोलणं मध्येच थांबवत अमन म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आरती बोलते हा बोल ना अमन आपले डोळे बंद करतो त्याचे हात पाय कापत असतात तरीसुद्धा तो हिम्मत करून तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे.

हे ऐकताच आरतीचे हृदय धडधड करू लागलं तिला समजतच नाही की काय बोलावं ती गप्पच राहते अमन तिला म्हणतो काहीतरी बोल प्लीज तू माझ्याबद्दल काय विचार करतेस कितीतरी वेळ आरती गप्पच होती अमन बोलतो मी तुझ्या उत्तराची वाट बघेन आणि तिथून निघून जातो आरती बराच वेळ बस स्टॉप वर तशीच उभी राहते थोड्या वेळानंतर तिची बस येते आणि ती घरी निघून जाते.रात्रभर दोघेपण झोपत नाहीत आरती विचार करत असते काय उत्तर देऊ अमनला हे बरोबर आहे की चुकीच आहे त्यामुळे तिला झोपच लागत नाही तर दुसरीकडे अमन तिच्या उत्तराची वाट बघत त्याला झोपच लागत नाही तो विचार करत असतो की दुसऱ्या दिवशी आरती मला काय उत्तर देईल.दुसऱ्याच दिवशी अमन कॉलेजला लवकर जातो तो बघतो तर आरती कॉलेजला आलीच नव्हती त्याच्या मनात अनेक प्रश्न पडतात की आरती का आली नसेल कॉलेजला काय झाल असेल.

तो कुणाला विचारु सुद्धा शकत नव्हता त्याला वाटत होतं की कुणाला समजलं तर आरतीला काही त्रास व्हायला नको.त्याचं लक्ष कॉलेजमध्ये लागतंच नाही त्याच्या मनात आरतीचाचं विचार चालू असतो. कॉलेज सुटल्यावर अमन बस स्टॉपवर जाऊन बराच वेळ उभा राहतो जिथे दोघेजण नेहमी भेटत होते उदास होऊन घरी निघून जातो या आशेवर आरती उदया कॉलेजमध्ये भेटल्यावर तिला विचारेन. आरती दुसऱ्या दिवशी कॉलेजला येते कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे बसस्टॉप वर अमनला भेटते.

अमन तिला विचारतो काल का आली नव्हतीस कॉलेजला आरती बोलते खूप वेळ झाला होता म्हणून मी काल कॉलेजला नाही आले अमन बोलतो याच्या अगोदर सुद्धा खूप वेळा तुला वेळ झाला आहे कॉलेजला यायला तरीसुद्धा तू आली होती मग काल का नाही आलीस आरती बोलते काल खूपच उशीर झाला होता मी लेट उठले होते आणि बस सुद्धा चुकली म्हणून मी काल नाही आले कॉलेजला.अमन बोलतो मी तुला काही तरी विचारलं होतं तु काहीचं उत्तर नाही दिलीस.

आरती बोलते काय उत्तर देऊ मलाचं समजतं नाही आहे. अमन बोलतो यात न समजण्या सारखं काय आहे तुझ्या डोळ्यात समजतं तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. मी पाहीलं आहे तुझ्या डोळ्यात आरती हसायला लागते तो बोलतो मला समजलं तुझं उत्तर मला तुझ्याशी बोलायचे असेल तरं कस बोलणार. तु तर तुझा नंबरच मला नाही दिलीस ती बोलते तुझा नंबर दे मी तुला फोन करेन त्यावेळेस तू माझ्याशी बोल पण मी जेव्हा नसेल त्यावेळेस तू फोन नको करू कारण माझा फोन पप्पांच्या हातात असतो. तो तिला नंबर देतो तेवढ्यात तिची बस येते आणि दोघे पण निघून जातात.

संध्याकाळी तो आरतीच्या फोनची वाट बघत राहतो रात्र होते तरीसुद्धा आरतीचा एकही फोन येत नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आरतीला भेटल्यानंतर ना तो विचारतो काल फोन का केली नाहीस मी तुझ्या फोनची वाट बघत होतो आरती बोलते काल माझा फोन माझ्या हातात नव्हता पप्पांच्या कडे होता त्यामुळे तुला फोन कसा करावा हेच समजत नव्हतं आणि फोन केला तरी काय बोलावं हे कळत नव्हतं.

अमन बोलतो ह्यात फोन केल्यावर काय बोलावं हे न कळण्यासारखं काय आहे फोन केल्यावर आपण बरचं काही आपोआप बोललो असतो. अमन आणि आरती दररोज कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉप वर भेटत होते आता आरती अमनला हळूहळू कॉल करायला लागली होती बऱ्याच गप्पा त्या दोघांच्या मध्ये होत होत्या.एक दिवस असा आला की अमनचा कॉलेजमधला शेवटचा दिवस होता कारण अमन बारावीला असल्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांना सुट्ट्या पडणार होत्या.

दोघेपण कॉलेज सुटल्यावर बस स्टॉप वर भेटतात तेव्हा आरती खूप उदास होते कारण उद्यापासून अमन कॉलेजला येणार नाही म्हणून अमन सुद्धा खूप उदास होता कारण उदयापासून आरतीला भेटता येणार नाही म्हणून आरती बोलते बोर्ड परीक्षेचा चांगला अभ्यास कर चांगले मार्क काढ मन लावून अभ्यास कर अमनचे डोळे भरून येतात तो बोलतो मी तुला उद्यापासून भेटू नाही शकणार आरती बोलते मी तुला तर रोज फोन करेन ना असा उदास नको होऊ अभ्यासाकडे लक्ष दे.

अमनला आरतीला घट्ट मिठी मारायची होती पण ते दोघे बस स्टॉप वर उभे होते म्हणून आरतीचा हात हातात धरून गप्प उभाराहतो आणि त्या दोघांना असं वाटू लागतं की हा क्षण इथेच थांबावा आणि आयुष्यभर ते दोघेजण सोबत असेच असावे.आरतीच्या बस येण्याचा टाईम होतो आरती बोलते मला आता घरी जायला हवं बस येण्याची वेळ झाली अमन आरतीचा हात सोडतच नाही बस येते अमर तिचा हात घट्ट पकडून राहतो तिचा हात सोडतच नाही आरती बोलते वेळ झाला तर मम्मीला काय उत्तर देणार एवढ्या वेळ का झाला म्हणून आरतीची बस सुद्धा निघून जाते बघ व सुद्धा निघून गेली आता दुसऱ्या बसची वाट बघावी लागेल.

अमन तिच्याकडे बघतच राहिला दुसरी बस सुद्धा आली आरती बोलते प्लीज आता मला सोड मला जावं लागेल नाहीतर मम्मी मला खूप ओरडेल अमन बोलतो तुला मला प्रॉमिस करावे लागेल की तू मला दररोज फोन करशील म्हणून आरती त्याला प्रॉमिस करते आणि बस आल्यावर बस मध्ये चढते अमन तिच्याकडे बघतच राहतो आरती त्याला बाय बोलते ती सुद्धा त्याच्याकडे बघतच राहते आणि बस निघून जाते. आरती त्याला दररोज फोन करत असते दररोज ते दोघेजण फोनवर बोलत असतात परीक्षा जवळ आलेली असते परीक्षेसाठी दोनच दिवस बाकी असतात.

अमनला आरतीला भेटायची खूप इच्छा असते त्यामुळे तो आरतीला काही न सांगता कॉलेज सुटायच्या टायमिंगला ते नेहमी भेटायचे त्या बस स्टॉप वर जाऊन उभे राहतो कॉलेज सुटल्यावर आरती बस स्टॉप वर येत असते तेव्हा ती अमनला तिथे बघून खूप खुश होते इकडे तिकडे ती काही बघत नाही धावत पळत सुटते आणि अमनला बस स्टॉप वर जाऊन भेटते आणि म्हणते तू इथे कसं काय काल फोनवर तू काहीच सांगितलं नाहीस की येणार आहेस म्हणून,आपण बोलतो तुला मला सप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आलो आरती बोलते बरं झालं आलास मला सुद्धा तुझी खुप आठवण येत होती मला तुला भेटायचं होतं अमन बोलतो मला तुझी खुप आठवण येत होती म्हणून मी भेटायला तुला इथे आलो आहे.

आरती बोलते परीक्षेसाठी दोन दिवस फक्त बाकी आहेत अभ्यास कसा चालू आहे अमन बोलतो अभ्यास जवळपास झालाच आहे. आरती बोलते तुला परिक्षेत चांगले मार्क घ्यायचे आहेत.परीक्षेला एक दिवस बाकी असतो आणि अमनचा मोबाईल खराब होतो अमनचा छोटा भाऊ मोबाईल बरोबर खेळत खेळत पाण्यात मोबाईल टाकतो आणि त्याचा मोबाईल खराब होतो.तो खूप उदास होतो की त्याला आता दुसरा मोबाईल सुद्धा मिळणार नाही कारण परीक्षा सुरू आहे त्यामुळे आता आरतीशी कसं बोलायचं याचं त्याला खूप टेन्शन येतं दुसरीकडे आरतीला सुद्धा समजत नाही काय झाल आहे अमनला फोन का लागत नाही.

अभ्यास करत असेल म्हणून फोन बंद केला असेल.परीक्षा झाल्यावर मला भेटायला येईल असं तिला वाटतं अमन सुद्धा विचार करतो की परीक्षा झाल्यावर आरतीला जाऊन भेटेन.शेवटी तो दिवस येतो अमनचा शेवटचा पेपर असतो अमनविचार करतो आज पेपर झाला की सरळ बस स्टॉप वर जाऊन आरतीला भेटेन.आज अमनचाहिंदीचा शेवटचा पेपर होता तो लवकर लवकर पेपर लिहीत होता तो खूप खुश होता की आज पेपर झाला की आरतीला जाऊन भेटणार पेपर संपतो आणि क्लास मधून लवकर निघून तो बस स्टॉप वर जातो.कॉलेज सुटायला अजून दोन तास बाकी होते तरीसुद्धा तो लवकर जाऊन बस स्टॉप वर उभा राहतो ते दोन तास सुद्धा त्याला वर्षासारखे वाटत होते कॉलेज सुटायची वेळ होते.

अमन ला आरतीला केव्हा भेटतो असं झालं होतं शेवटी कॉलेज संपतं आणि आरती त्याला दिसते आरतीला सुद्धा अमन दिसतो आरती त्याला भेटण्यासाठी पळत पळत येत असते.तिच्या हे लक्षातच येत नाही ती रोडवरून गाड्या न बघता पळत येत आहे पळत येत असताना साईडून एक ट्रक येतो आणि अमन काही करणार तेवढ्यात असतो ट्रक तिला धडक मारून निघून जातो अमनला काही कळतच नाही की नेमकं काय झालं अमन तिला रक्तबंबाळ झालेले बघून तिथेच बेशुद्ध होऊन पडतो बरेच लोक जमतात आणि ॲम्बुलन्स ला फोन करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये आरतीला घेऊन जातात.

अमनला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि आरतीच्या रूममध्ये जातो तर बघतो तर काय आरतीचे आई वडील आलेले असतात.आरतीचे वडील डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांना विचारतात की आमची मुलगी आता कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलतात की मी तुमच्या मुलगीला नाही वाचवू शकलो आय एम सॉरी हे ऐकताच अमनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला समजत नाही की काय करावे त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथूनच घराकडे रस्त्यावरून रडत रडत चालत निघतो. आज आरती माझ्यामुळे या जगात नाही आहे आज मी तिला भेटायला जर आलो नसतो तर आज आरतीचा जीव गेला नसता हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे म्हणून तो स्वतःलाच दोष देत असतो.

तो म्हणतो की मी आरतीचा गुन्हेगार आहे संध्याकाळ होते तो घरी निघून जातो घरी गेल्यावर त्याची आई त्याला विचारते कुठे होतास इतका वेळ पेपर कसा गेला तो काहीच बोलत नाही आपल्या रूममध्ये जातो आणि स्वतःला कोंडून घेतो बराच वेळ खूप रडतो त्याला असं वाटतं जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं आहे असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा रिझल्ट येतो तर त्याला रिझल्ट मध्ये चांगले मार्क पडले होते तरी सुद्धा त्याला त्याचा आनंद होत नाही त्याला आरतीची खूप आठवण येत असते तो म्हणतो आज आरती असते तर कितीतरी तिला आनंद झाला असता पण तिचा जीव माझ्यामुळे केला आहे मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत.

पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेरगावी जातो पण तो आयुष्यभर स्वतःला माफ करत नाही त्याला दररोज त्याला आरतीची आठवण येत असते तो कोणाशी बोलत नाही दररोज आरतीच्या आठवणीने तो रात्री झोपताना खूप रडत असतो कितीतरी वर्ष होतात तरीसुद्धा तो स्वतःला माफ करत नाही तो नेहमी आरतीचा गुन्हेगार असं स्वतःला समजत असतो आरतीचा जीव माझ्यामुळे गेला आहे मित्रांनो तुमची सुद्धा अशीच काहीतरी कहानी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला पाठवू शकता. आजची अमन आणि आरतीची कहानी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा. आत्तासाठी गुडबाय भेटूया अशाच आणखीन एका नव्या लव स्टोरी मध्ये.

-पूजा भोसले (तुझ्यासारखं कोणी नाही)

अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी ( Marathi Love Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

Also Read Marathi Love Story

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.