एक हटके लव्ह स्टोरी | Marathi Love Story

नमस्कार मित्रांनो, आजची एक हटके लव्ह स्टोरी खास तुमच्यासाठीच आहे.

मित्रांनो आजची लव्ह स्टोरी खास तुमच्यासाठीच आहे स्वाती ॲडव्हर्टायझिंगच्या एजन्सी मध्ये गेल्या एक वर्षापासून काम करत असते, या क्षेत्रात येण्याचा तिच्या घरच्यांना निर्णय अजिबात पटला नव्हता पण नेहमी ध्येयाचा विचार करणाऱ्या या स्वातीने आपल्या करिअरचा मार्ग आधीच निवडला होता. लास्ट इयरला तिची ओळख निलशी झाली. कॉलेजच्या फेस्टिवल मध्ये झालेली ही ओळख हळूहळू घट्ट मैत्री प्रेमात रुपांतरीत होत गेली.

प्रत्येकाचे खिल्ली उडवणारी ही स्वाती आता या नात्यचा विचार करू लागली होती पण मला काय रिलेशनशिप नको आहे. असं म्हणत नेहमीच निल त्यातून अंग काढत होता त्यादिवशी असेच एकदा कॅफेमध्ये त्या दोघांची भेट झाली त्यानंतर स्वातीने नीलच्या घरी जाण्यासाठी हट्ट धरला. निल ही तिला नकार देऊ शकला नाही घरी पोहोचतात थोड्या वेळानंतर नील “”लिसन टू मी” हा सांग त्याचं लक्ष पूर्णपणे मोबाईल मध्ये होते.

स्वातीने त्याच्या हातातील मोबाईल काढून घेतला आणि त्याला म्हणाली लिसन टू मी नील आता आपल्याला आपल्या रिलेशनशिप बद्दल विचार केला, पाहिजे स्वाती मला बंधने नको आहेत नील ताडकन बोलून गेला आय ॲम नॉट अ पपेट तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू युज करून मला विसरून जाणार का?

चार चार दिवस आपण बोलतही नाही पाचव्या दिवशी तुझं प्रेम जागं होणार का दिस इज अ नॉट अ वे स्वातीच्या रागाचा पारा इतका वाढला आणि तिच्या भावनांचा बांध आत मध्ये इतका फुटला की त्यांचं नातं सगळ्या बाजूने खूप चांगलं होतं एकमेकांवर सुद्धा खूप प्रेम करत होते पण कमेंटमेन्ट.

निल तिला म्हणतो की मी तुला आधीच सांगितलं होतं की मला कोणत्याही नात्यात अडकायचं नाही तेव्हा तुझी काहीच हरकत नव्हती आपण ज्या जगात वावरतोय ना नात्यांची डेफिनेशन बदलले स्वातीला असं म्हणत त्याने तिला दाराकडचा रस्ता दाखवला फार काही दया वया न करता तिने तुला नक्की समजेल असे म्हणत ती ताडकन निघाली. तितक्यात अँड वन मोर थिंग्स स्वाती थँक्स फॉर एव्हरीवन असे म्हणत निल त्याच्या आतल्या खोलीत निघून गेला तिच्या असण्या नसण्याने त्याला काही सुद्धा फरक पडत नव्हता.

गेल्या काही दिवसात त्याच्या वागण्यातून हे दिसतच होतं हे इतक्या फास्ट झालं की दुसऱ्या दिवशी स्वातीचा वाढदिवस होता हे स्वाती सुद्धा विसरली होती भावना वीवश झालेली स्वाती रडत रडत पुण्यात एकटी राहणारी ती आपल्या रूमवर आली आणि दडवून ठेवलेली रम तिने त्याचा आधार घेतला खूप रडत होती दुसऱ्या दिवशी भन भनलेल्या डोक्यानेच ती ऑफिस साठी रेडी होत होती तोपर्यंत फेसबुकवरचा मेसेज पपेट झाला हॅपी बर्थडे स्वाती तो मेसेज तिच्या बॉसचा होता वाव इट्स माय बर्थडे असं म्हणत ती मुश्किलीने हसते आणि बॅग उचलून ती ऑफिसमध्ये गेली .

नेहमीच सगळ्यांशी हसून बोलणारी स्वाती सगळ्यांना मोटिवेट करणारी स्वाती आज खूप रागाने ऑफिस बॉय ला बोलते हा टेबल पहिला स्वच्छ कर ती आपल्या ज्युनिअर ला फोन करून बोलवून घेते आणि म्हणते व्हेर इज माय डिक्शनरी कुठे गेली माझी डिक्शनरी तुम्हाला सांगितलं होतं ना मला विचारल्याशिवाय कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही तिचं हे रागिष्ट वागणं बघून ऑफिस मधल्या बाकी लोकांची चर्चा सुरू झाली होती.

इतकी गोड मुलगी आज हंटर वाली का झाले आहे बहुतेक निलने हिला ढील दिली वाटतं असे एक जण पटकन म्हणाला त्या दिवशी ती नेहमीपेक्षा वेळेच्या अगोदरच घरी निघाली होती.सगळ्यांना असं वाटलं की आज वाढदिवस आहे म्हणून ती गेली असेल पण याची कल्पना कोणालाच नव्हती की त्या दोघांच्या मध्ये नवीन वळण आला आहे.

स्वाती आत चक्क टॅक्सीने न जाता ट्रेनने जात होती पण ती केव्हाच ट्रेनने प्रवास करत नव्हती आज चक्क ती कॉमन लेडीज कंपार्टमेंट मधून गेली पुढील स्टेशन आलं आहे असं कधीही न थकणारी आणि कधीही न दिसणारी ती बाई बोलून गेली ती स्टेशनवर उतरली स्टेशनवर खूप गर्दी होती एकमेकांना धक्के देणाऱ्या त्या गर्दी मधून स्वातीने घरचा रस्ता पकडला आणि एकमेकांना ढकलत तिने आपल्या घरचा रस्ता पकडत एकमेकांना ढकलत पुढे जाणाऱ्या गर्दीतून जात होती तिच्यासाठी हे सगळं काही नवीन होतं.

पुलावरून जात असताना एका गर्दीचा लोट आला तेव्हा तिला काय कळलेच नाही सर्वांसाठी हे रोजच होतं तिच्या पाठीमागे असणारे एका मुलग्याने तिला म्हटलं खूप गर्दी आहे आणि तुम्हाला माझा धक्का सुद्धा लागू शकतो हे नेहमीच होतं ती म्हणाली नो इशू असं म्हणत कशीबशी ती त्या गर्दीतून निघून घरी जाते आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येते पुन्हा चिडचिड आणि पुन्हा परत ट्रेनचा प्रवास पुन्हा गर्दी पण ती गर्दी काहीतरी वेगळीच होती, का माहित नाही पण एवढी गर्दी होती की परत एकदा पुन्हा तो मुलगा तिला तिथे भेटला पण खूप गर्दी असल्याने तिला असं वाटलं की त्याचा हा नेहमीचाच रस्ता आहे हे डिटेक्टिव स्वातीच्या लक्षात आले पण त्याचे लक्ष तिच्याकडे अजिबात नव्हतं आज जरा जास्तच गर्दी होती हे तिच्या लक्षात आले होते मागच्या व्यक्तीने तिला दोन्ही हाताने कव्हर केलं होतं बहुतेक जास्त गर्दी असावी म्हणून ती शांतपणे गाणी ऐकत त्या गर्दीतून चालत होती सरते शेवटी पुल संपला आणि ते दोघेही आपापल्या वाटेने निघून गेले.

कोण होता तो? असा पुसटसा प्रश्न तिच्या मनात आला आपल्याला काय करायचंय असं म्हणत तिने रेल्वे स्टेशनच्या पायरीवर तो विषय सोडून दिला. असेच कितीतरी दिवस निघून जातात स्वातीने आता स्वतःला बऱ्यापैकी सावरले होते निल आणि तिच्याबरोबर झालेल्या त्या भांडणातून त्या ब्रेकअप मधून ती आता रोजच ट्रेनमधून प्रवास करू लागली होती.

आजही तिचं काम लवकर आवरलं होतं नेहमीप्रमाणेच ती ट्रेनने स्टेशनवर गेली तेव्हा तीच गर्दी तेव्हा तोच गर्दीचा लोट आणि तेव्हा तोच हेल्प वाला मित्र जिन्यावरून तिच्या समोर आला स्ट्रेन्ज ती थोडीशी हसली त्यांच्या ओळखीनंतरच हे त्यांचं पहिलंच हास्य असेच दिवस निघून जातं होते आणि तीचा हा हेल्प वाला मित्र आता खूप आपलासा वाटू लागला होता.

फक्त स्टेशन पुरताच त्या पुलावर त्याच्याशी तिचा संबंध येत होता आता तो जिन्यावरून गेल्यानंतर स्वातीच्या ट्रेनसाठी तो थांबून असायचा अर्थात फार वेळ नाही कारण त्या पुलावर गजबजलेल्या गर्दीच्या प्रवाशांच्या मंत्रपुष्पांजलीचा सामना कोण करणार तो नेहमीच स्वातीच्या पाठीमागून जायचा आपलं कोणीतरी या पुलावरून या गर्दीतून नीट जावं म्हणून तो तिला नेहमीच साथ द्यायचा.

स्वातीने आता स्वतःला खूप सावरले होते ती आता शांत झाली होती ती काम करत असताना तिला वाटतं तिच्या मनात विचार येतात की आता त्याला विचारलेच पाहिजे त्याचं नाव तरी कळू दे common स्वाती अगर वो नही तो तुम ही सही किसी ने तो पूछना ही पडेगा आज तिने पूर्ण प्लॅन केला होता मनाची तयारी केली होती पण प्लॅन फिस्कटले नाही तर ते प्लॅन कसले आज तिला बराच वेळ झाला होता. नऊ वाजले होते चिडचिड करत ती ऑफिस मधून बाहेर निघाली रिक्षामध्ये बसते पण ट्रॉफीक खूप होतं ती रिक्षावाल्याला म्हणते भैया जल्दी चलो ना मेरी ट्रेन छुट जायेगी मनातल्या मनात नशिबाला ती दोष देत होती ट्रेनमध्ये चढते खूप राग राग करते शिव्या देत नशिबाला स्टेशन आल्यावर ती स्टेशनवर उतरते बराच वेळ झाल्यामुळे गर्दी सुद्धा नसते.

एकटीच तिथून ती चालत निघून जात असताना पाठीमागून हॅलो म्हणत तिच्या खांद्यावर कुणीतरी थाप मारली इतक्या उशिरा ती ही अनोळखी हॅलो कोण म्हणतय तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि ती पाठीमागं वळून बघते तर कहानी मी ट्विस्ट हा तोच मुलगा होता जो स्वातीच्या पाठीमागे राहून तिला रोज पुल पार् करून देत होता.

स्वाती आश्चर्य होते आणि बोलते ओ आप मुझे लगा आप गये होंगे त्यावर तो बोलतो कैसे मे जाता आपको अकेले छोडके स्वाती दोन मिनिटं गप्पच राहते तिला समजतच नाही काय बोलावे हे असं काही घडत होतं जणू काही एखाद्या फिल्ममध्ये होते पण हे खरं खरं होतं स्वातीचा यावर विश्वासच बसत नव्हता.

त्याने हात पुढे करत हाय आय एम सचिन शुक्ला त्यावर स्वाती बोलते हाय आय एम स्वाती असं म्हणत दोघांनीही प्रोफेशनल ओळख करून घेतली दोघेही चालत चालत पुढे जाऊ लागले नेहमीप्रमाणे दोन जिन्याने न जाता दोघेही एकाच जिन्याने जाऊ लागले आणि अशा प्रकारे स्वातीच्या आयुष्यात एक नवीन पालवी फुटली एक नवी सुरुवात आणि एक नवीन प्रवास मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि आणि आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा भेटूया पुढच्या कहानी मध्ये तोपर्यंत धन्यवाद

-पूजा भोसले(एक हटके लव्ह स्टोरी)

अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी ( Marathi Love Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

Also Read Marathi Love Story

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.