आई बाबा किती दृष्ट असतात ना….| Motivational Marathi Story

प्रत्येकाला असं वाटतं की आई बाबा आपल्याला काही ना काही तरी सांगतच असतात. त्यांच्या भल्यासाठी सांगतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. आज आपण अशीच गोष्ट बघणार आहोत.

एका जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होते. त्याचा संसार खूप छान असतो.त्या दोघांना सुंदर पिल्ले होतात. आईबाबा म्हणून ते नेहमी सगळी काळजी घेत असतात. त्यांना वेळेवर चारा,पाणी सर्व काही देत असतात. हळू हळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात.

रोज जंगलातून चिमणां चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधून घेऊन येत असतं. कधी कधी तर ते स्वतः आशी राहयचे पण पिल्लांना पोटभर खालन घालायचे. एक दिवस चिमणां अन्नाच्या शोधात खूपं लांब जातो पण त्याला काही मिळतं नाही. हताश होऊन घरी येतो. भुकेने व्याकूळ झालेल्ल्या पिल्लांना पाहूण खूप रडतो.

चिमणां चिमणीची पिल्ली आता मोठी होऊ लागतात पण त्यांना आयते खाण्याची सवय लागते. चिमणी विचार करते आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करती आली पाहीजे. मग ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून देते. पिल्लू खाली पडणार म्हणून त्याला सावरते सुद्धा पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नाहीत.

ती रोज पिल्लांना ढकलून दयायची पण पिल्लि काही आपले पंख फडफडत नसतं कारण त्यांना आयते खाण्याची सवय लागली होती. त्यांना असे वाटायचे की आईबाबां कीती दृष्ट आहेत. एक दिवस चिमणां चिमणी दोघेही आजारी पडतात. आणि सगळे उपाशी राहतात कारण अन्न आणणार कोण? पिल्लांना तर उडताच येतं नव्हतं. मग तर चिमणां चिमणीचा निर्धार पक्का होतो.

काहीही झालं तरी पिल्लांना उडता आलं पाहिजेत. ते आपले प्रयत्न सोडत नाहीत. रोज प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. पिल्ली उडायला शिकतात. स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात. तेंव्हा त्या पिल्लांना समजते की आपले आई बाबा आपल्याला आपल्या पंखात बळ
 येण्यासाठी रोज घरट्यातून ढकलून देत होते. आपले आई बाबा दृष्ट नाहीत तर ते आपल्याच भल्याचा – विचार करत असतात.

‘ म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बाबा केंव्हाच दृष्ट नसतात ते नेहमी आपला चांगलाच विचार करत असतात..

-पूजा भोसले

अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी (Motivational Marathi Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

Also Read Motivational Marathi Story

1 thought on “आई बाबा किती दृष्ट असतात ना….| Motivational Marathi Story”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.