नमस्कार, Eknath Shinde Biography in Marathi, एकनाथ शिंदे बायोग्राफी मराठी, Eknath Shinde Information in Marathi मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे.
या लेक मध्ये मी एकनाथ शिंदेची सर्व माहिती देणार आहे. तसच Eknath Shinde चरित्र या लेखात सांगणार आहे.
एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला.
हे सध्या महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत.
एकनाथ शिंदे बायोग्राफी मराठी (Eknath Shinde Biography in Marathi)
नाव | एकनाथ शिंदे |
निकनेम | – |
जन्म स्थान | जावली तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
जन्म दिनांक | 9 फेब्रुवारी 1964 |
वय | 58 वर्ष |
शिक्षण | बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) |
आईचे नाव | गंगुबाई संभाजी शिंदे |
वडिलांचे नाव | संभाजी नवलू शिंदे |
जात | मराठा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
एकनाथ शिंदे प्रारंभिक जीवन (Eknath Shinde Early Life)
एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी जावली तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र झाला.
एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातील होते त्यांनी आपलं शिक्षण फक्त अकरावी पर्यंत पूर्ण केल्या त्यानंतर त्यांना घर चालवण्यासाठी ऑटोरिक्षा चालवावा लागला
आजचे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री आहे
एकनाथ शिंदे शिक्षण (Eknath Shinde Education)
एकनाथ शिंदे यांच्या शाळेचे शिक्षण ठाणे महानगरपालिका शाळा, किसन नगर येथून पूर्ण झाले.
एकनाथ शिंदे यांचा हायस्कूलचे शिक्षण राजेंद्र पाल मंगला हिंदी हायस्कूल, ठाणे येथून पूर्ण झाले.
एकनाथ शिंदे यांनी अकरावी चे शिक्षण मंगला हायस्कूलमधून पूर्ण केले.
परंतु बारावीमध्ये त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले आणि त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली.
एकनाथ शिंदे कुटुंब (Eknath Shinde Family)
एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलू शिंदे हे आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आईचे नाव गंगुबाई संभाजी शिंदे हे आहे. त्यांच्या आईचे निधन 18 एप्रिल 2019 रोजी झाले.
एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचे नाव लता एकनाथ शिंदे आहे.
एकनाथ शिंदे यांना तीन मुले होती. त्यापैकी 2 मुलगा आणि एक मुलगी होती.
त्यांची नावे दिपेश शिंदे शुभदा शिंदे, श्रीकांत शिंदे हे आहेत.
परंतु 2 जून 2000 सातारा मध्ये अपघातात त्यांची दोन मुले दिपेश शिंदे शुभदा शिंदे मरण पावली.
एकनाथ शिंदे राजनीति (Eknath Shinde Politics Career)
1980 च्या दशकात जेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या नोकर्या करत होते, तेव्हा ते शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या संपर्कात आले, ज्यांनी त्यांना शिवसेनेत जाण्यास मदत केली.
1980 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
लवकरच, त्यांनी महागाई, काळाबाजार, व्यापार्यांकडून पामतेल सारख्या जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक इत्यादींसह त्यांच्या पक्षाने सुरू केलेल्या अनेक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.
1985 मध्ये, त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात भाग घेतला, त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना 40 दिवसांपेक्षा जास्त काळ बेल्लारी तुरुंगात ताब्यात घेतले.
शिंदे यांनी एक कार्यकर्ता म्हणून निष्ठेने शिवसेनेचे काम केले.
1997 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत आनंद दिघे यांनी शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले.
2001 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील शिवसेना वाचवण्यासाठी त्यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांची ठाणे जिल्ह्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद आणि बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आली.
शिंदे यांना पहिल्याच निवडणुकीत विजय मिळाला. 2001 मध्ये ते महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते(Eknath Shinde Biography in Marathi) झाले.
त्यानंतर 2002 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. 2001 मध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिंदे यांचा शिवसेनेतला प्रभाव वाढला
ठाण्यातील राजकारणात शिंदे यांचे राजकीय मैदान मजबूत होऊ लागले.
नारायण राणे यांनी 2005 मध्ये पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेत शिंदे यांचा मान आणखी वाढला.
ठाकरे कुटुंबात तेढ निर्माण झाली आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे ठाकरे कुटुंबाच्या जवळ आले.
2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने शिंदे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते.
येथेही शिंदे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचा 37 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
2013 मध्ये बकरी ईदच्या मुहूर्तावर मुस्लिमांना दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, या गडावर इतकी वर्षे हिंदू धार्मिक विधी करत होते. या हिंदू-मुस्लिम संघर्षामुळे हिंदूंना या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर पूजा करण्यास प्रतिबंध करण्यात आला.
याच घटनेचा शिवसेनेने निषेध करून एकनाथ शिंदे यांच्यासह 177 कार्यकर्त्यांना अटक(Eknath Shinde Biography in Marathi) केली होती.
ठाणे शहरासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट आणि ठाणे मेट्रो या प्रकल्पांना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने मंजुरी देण्यात आली.
ठाण्यातील इमारतींच्या बेकायदा बांधकामांमुळे घराबाहेर फेकल्या गेलेल्या लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाशी संबंधित प्रश्न ते अनेकदा मांडतात.
2009, 2014 आणि 2019 मध्ये शिंदे ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेत पोहोचले.
जानेवारी 2019 मध्ये, उद्धव ठाकरे यांनी त्यांची महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती केली.
आरोग्यमंत्री असताना त्यांनी अनेक सरकारी रुग्णालयांमधील एमबीबीएस डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या 890 रिक्त जागा भरल्या.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत वेतन देण्यासाठी नियमावली जारी केली आणि त्यांचे वेतन वाढवले.
उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस केंद्रे सुरू केली.
‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेंतर्गत ६० दवाखाने मंजूर करून ठाणे महापालिका आणि जितो या सेवा संस्था यांच्या सोबत मिळून ठाण्यातील हाजुरी येथे महावीर जैन रुग्णालय नावाचे रुग्णालय सुरू करण्यात आले.
शिंदे हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
राजकारण का सोडले होते
सातारा मध्ये बोटिंग करत असताना त्यांनी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा दीपेश आणि 7 वर्षांची मुलगी शुभदा यांना गमावले.
बोटिंग करत असताना अपघात झाला आणि शिंदे यांची दोन्ही मुले डोळ्यासमोर बुडाली.
अपघातानंतर शिंदे यांनी राजकारणाला काही दिवस थांबण्यासाठी विचार केला होता त्यावेळी एकनाथ शिंदे(Eknath Shinde Biography in Marathi) नगरसेवक होते.
त्यावेळी शिंदे यांचा दुसरा मुलगा श्रीकांत अवघा 13 वर्षांचा होता. या घटनेने दुखावलेल्या शिंदे यांनी राजकारणही दूर केले.
यादरम्यान त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांनी त्यांना साथ दिली आणि त्यांना पुन्हा सार्वजनिक जीवनात आणले.
एकनाथ शिंदे एकूण संपत्ती (Eknath Shinde Net Worth)
2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शिंदे यांच्याकडे एकूण 11 कोटी 56 लाखांहून अधिक संपत्ती आहे.
यामध्ये 2.10 कोटींहून अधिक जंगम मालमत्ता आणि 9.45 कोटींहून अधिक स्थावर मालमत्ता जाहीर करण्यात आली.
FAQ on Eknath Shinde Biography in Marathi
एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचे नाव काय आहे?
एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलू शिंदे हे आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आईचे नाव काय आहे?
एकनाथ शिंदे यांच्या आईचे नाव गंगुबाई संभाजी शिंदे हे आहे.
एकनाथ शिंदे यांचे किती शिक्षण झाले आहे?
एकनाथ शिंदे यांचे बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) शिक्षण झाले आहे.
एकदाच शिंदे हे कितवे मुख्यमंत्री आहे?
एकनाथ शिंदे हे 20वे मुख्यमंत्री आहे.
एकनाथ शिंदे यांचे वय किती आहे?
एकनाथ शिंदे यांचे वय 58 वर्ष आहे.
एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे?
एकनाथ शिंदे यांची जात मराठा आहे.
निष्कर्ष
एकनाथ शिंदे बायोग्राफी मराठी (Eknath Shinde Biography in Marathi) मध्ये तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.
जर तुम्हाला आमचं आर्टिकल आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.