मितवा | Marathi Love Story

नमस्कार मित्रांनो आज आपण अशी एक स्टोरी बघणार आहोत जी आपल्या जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. बस निघणारच होती तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा असा समोर आला. संपूर्ण बस भरली होती बसायला जागाच नव्हती आयुष्य पण असे आहे ना केव्हा केंव्हा अशा गोष्टी घडवून आणत की आपल्याला त्या माहीतच नसतात. संपूर्ण बस भरली होती म्हणून पाठीमागची सीट मोकळी होती म्हणून ती त्या जागेवर जाऊन बसते .

थोड्यावेळाने समोरून ओळखीची अशी एक व्यक्ती आली आणि येऊन शेजारी गप्पच बसली. ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तिचा लग्नाअगोदरचा प्रियकर होता पण त्याने तिला ओळखलंच नव्हतं कारण तिचं लग्न झाल्यामुळे ती साडी मध्ये होती. तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईल बघत असतो. ती त्याच्याकडे बघतच असते अजून सुद्धा तो तसाच होता पहिल्या सारखाच त्याला चष्मा लागला होता पण त्याचे केस एक सुद्धा पिकलेले नव्हते.

थोडीशी मोठी झाली आहे म्हणून त्याने मला ओळखले नसेल असं तिला वाटतं..ती खूप उदास होते तिला वाईट वाटतं की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं. आत्तापर्यंत ज्याला विसरूही शकले नाही ज्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात पण त्याने मला ओळखलंच नाही.मान्य आहे की त्याचेही लग्न झाल आहे आणि माझेही लग्न झाल आहे म्हणून कोणी असं लगेच कुणाला विसरून जातं का? त्याला माझी आठवण येत नसेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात.

बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जातंच नाही तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होतात. दोघेजण एका कॉलेजच्या function मध्ये अशाप्रकारे भेटले होते की दोघांची एकमेकांना धडक झाल्यामुळे खूप भांडणं झाले होते. दोघेजण एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते. जेंव्हा जेंव्हा कॉलेज मध्ये function असायचे तेंव्हा तर आणखी जास्तच भांडण व्हायचं असेच बरेच दिवस जातात आणि annual function जवळ येते दोघेपण डान्स मध्ये भाग घेतात.

तिला त्याला काहीही करून डान्स मध्ये हरवायचं असतं म्हणून जोराची प्रॅक्टिस तिची चालू असते तर दुसरी कडे त्याला तिचे सर्वांसमोर हस करायचे असते म्हणून तो तिला डान्स करतांना स्टेजवर पाय घसरून पाडण्याची तयारी करतो. सरते शेवटी annual function चा दिवस येतो.function चालू होते प्रत्येकजण आपली वेगवेगळी आदाकरी सादर करतात.

तिचा डान्स सुरु होतो अतिशय सुंदर डान्स ती करत होती तो पाठीमागून हळूच येतो आणि तिच्या पायांमध्ये कॉइन टाकतो कॉइनवरून तिचा पायघसरून ती स्टेजवर पडते. सगळेजण तिला हसू लागतात तिला खूप वाईट वाटते आणि ती रडत रडत रागाने तिथून निघून जाते पण त्याला खूप मज्जा येते. दोन तीन दिवस होतात पण ती कॉलेजला येतचं नाही त्याच्या ते लक्षात येतं की ती कॉलेजला येतच नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे तिचं नुकसान होतं आहे तो तिच्या घरचा पत्ता तिच्या मैत्रिणींना विचारून घरी जातो आणि तिला सॉरी बोलतो.

त्यानंतर दोघांच्या मध्ये खूप चांगली मैत्री होते दोघेमिळून कॉलेज मध्ये धमाल करायचे. दोघांना समजतंच नाही की केंव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघेपण भेटतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात.असेच बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा फोन येतो मला माफ कर माझं लग्न ठरलंय मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत असं बोलून तो फोन ठेवतो बस थांबते आणि ती आठवणींन मधून बाहेर येते अजूनही त्याचं लक्ष मोबाईल मध्येच होतं त्याने तिला पाहिलेच नव्हते.

तिचा स्टॉप आल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजूला होता का?मला जायचं आहे म्हणून बोलते. ओळखीचा आवाज कानावर पडताचं तो तिच्याकडे बघतो तर काय तो तिला लगेच ओळखतो तेवढ्यात ती बसमधून उतरते तो पण आपल्याला पुढे जायचे आहे हे विसरून तिच्या सोबतचं उतरतो.

आणि तिला भेटतो तिला बघून त्याचे डोळे भरून येतात विचारतो कशी आहेस ती बोलते कुठे होतास इतकी वर्ष, तुला एकदाही माझी आठवण नाही आली,का खेळलास माझ्या भावनांशी, तुला काहीच कसं वाटलं नाही माझ्या भावनांशी खेळताना असं नातं तोडून कधी तुटतं का? तुला जर दुसरी मुलगी आवडत होती तर तू माझ्याशी प्रेमाच का नाटक केलास.

तो बोलतो माझा नाईलाज होता म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं पण खरं प्रेम मी तर तुझ्यावरच केले आणि अजूनही तुझ्यावरच करतो ती बोलते नाईलाज म्हणजे काय झालं होतं तो बोलतो माझा नाईलाज होता माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिले होते की त्यांच्या मुली सोबतच माझं लग्न होईल आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी तिच्याशी लग्न करावं म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं.

तुझं कुणाशी लग्न झाल आहे.तू सुखी आहेस ना? ती बोलते तुझ्या फोन नंतर तु कधी परत भेटलाच नाहीस तुझी खूप वाट पाहिली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई-वडिलांनी माझं सुद्धा लग्न करून दिलं. दोघांच्या मध्ये बराच वेळ खूप गप्पा चालतात त्याच्या हातात अजूनही तिने दिलेलं ताब्याचं कड हातातच होतं तो बोलतो दररोज हे कड मला तुझी आठवण करून देत.ती बोलते तुला माझी एवढीच आठवण येते तर तु मला भेटला का नाहीस तो बोलतो तुझ आता तुझ असं आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे म्हणून मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून नाही भेटलो.

जीवनातील असा एक क्षण होता तो कि ती मरेपर्यंत विसरू शकत नव्हती. तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरूनच सोडून जातो परत त्या दोघांच्या मध्ये कधीच बोलणं होत नाही कारण त्या दोघांनी एकमेकांचा नंबरच घेतला नव्हता.आजही तिला त्याची आठवण येते त्याच्या आठवणीने तिचे आजही डोळे भरून येतात मित्रांनो कशी वाटते तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहानी मध्ये तो पर्यंत धन्यवाद.🙏

-पूजा भोसले (मितवा)

अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी ( Marathi Love Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

Also Read Marathi Love Story

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.