कादर आणि किरण ची प्रेम कथा- Marathi Love Story

कादर आणि किरण ची प्रेम कथा – माझे नाव कादर आहे. माझ्या प्रियशीचे नाव किरण आहे. ही प्रेम कथा माझ्या आयुष्यातील प्रेम कथा आहे. माझी प्रियशी माझ्याच कॉलेजमध्ये शिकत होती. माझे तिच्यावर खुप प्रेम होते. पण मी तिला माझे प्रेम व्यक्त करण्यास भीत होतो. विशेष म्हणजे ती माझ्याच गावात राहात होती. मी तिला एकदा – दोनदा माझ्याच गावातील मंदिरात पाहिले होते. पण किरण माझ्याच कॉलेजमध्ये शिकतेय हे मला माहीत नव्हते. मी तिला माझ्या कॉलेजमध्ये पाहिले तेव्हा मी तिला बघतच राहिलो. ती त्या दिवशी खुपच सुंदर दिसत होती. मी तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. मी फक्त तिला बघण्यासाठी कालेजला जायचो.

मी तिच्या मैत्रीणींकडून तिचा नंबर / प्रोफाइल ( आईडी ) घ्यायचा प्रयत्न केला. पण तिच्या एकाही मैत्रीणीने मला किरण चा नंबर / प्रोफाइल ( आईडी ) दिली नाही. मी तिच्यावर अतोनात प्रेम करत होतो. मी तिचे प्रेम मिळवायला काहीही करायला तयार होतो.

जेव्हा ती तिच्या मैत्रीणींसोबत मागे वळून बोलत असायची तेव्हा मी तिच्याकडे बघत बसायचो. मी तिच्याकडे बघत असताना तिची नजर माझ्यावर पडली की ती पुढे बघायची आणि नंतर मागे वळून बघत नसायची. असच तिच्याकडे बघत बसुन मी दिड वर्ष वाया घालवले.

अखेर तो दिवस आला ज्या दिवशी मी तिला प्रपोज केला. त्या दिवशी मोठी आषाढी वारी होती. आषाढी वारीमुळे आमच्या कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिंडी यात्रा काढायची ठरवली. आमच्या कॉलेजमधुन सर्वजण दिंडी यात्रेसाठी बाहेर पडलो. कॉलेजमध्ये फक्त मी आणि माझे दोन मित्र राहिलो होतो. माझ्या मित्राला माहीत होते की माझे किरण वर प्रेम आहे. मग माझा मित्र मला म्हणाला की आज कॉलेजमध्ये कोणी नाही तर तु तिला चिठ्ठी लिहून प्रपोज कर. मी पण काही विचार न करता तिला चिठ्ठी लिहीली आणि तिच्या दप्तरात तिला दिसेल अशा ठिकाणी ठेवली. मग आम्हीही दिंडी यात्रेसाठी बाहेर पडलो. 4-5 किलोमीटर दिंडी यात्रा करून आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. कॉलेजमध्ये आल्यानंतर 15 मिनीटांचा ब्रेक होता. त्यानंतर कॉलेजचा नेक्स्ट लेक्चर सुरू होणार होता.

मग नंतर सर्व मुली ब्रेक घेऊन क्लासरुम मध्ये गेल्या. सर्व मुलही गेली. मी आणि माझे दोन मित्र बाहेरच थांबलो होतो. आम्ही थोड्या वेळाने क्लासरुम मध्ये गेलो तेव्हा लेक्चर सुरू झाला होता. आम्ही गेलो आणि आमच्या बेंचवर जाऊन बसलो. तेव्हा ती माझ्याकडे खुपच रागाने बघत होती. मी ओळखले की तिने चिट्ठी वाचली आहे. मी काही न बोलता तिच्याकडे न बघता लेक्चर पूर्ण केला. तेवढ्यात कॉलेज सुटायची घंटा वाजली.

पुढल्या दिवशी शनिवार होता. मी नेहमी प्रमाणे कॉलेजला गेलो. मी क्लासरुम मध्ये पाय ठेवताच ती माझ्याकडे बघु लागली पण ती या वेळेस प्रेमाने बघत होती मी क्लासरुम मध्ये दप्तर ठेवुन बाहेर येत होतो तेवढ्यात तिने मला हाक मारली आणि एक चिट्ठी दिली. मी ती चिट्ठी घेऊन क्लासरुम मधून बाहेर पडलो. क्लासरुम मधून बाहेर पडल्यानंतर मी ती चिट्ठी वाचली. तिने चिट्ठीच्या रूपात मला नकार दिला होता.

पुढल्या दिवशी रविवार होता. कॉलेजला सुट्टी होती त्यामुळे मी तिला काहीच विचारू शकलो नाही, की तिने मला नकार का दिला ?

सोमवारी मी तिला विचारण्यासाठी लवकर कॉलेजला गेलो पण ती आली नव्हती. पहिला लेक्चर सुरू झाल्यानंतर आली. मी तिला सोमवारी सकाळी पण काही विचारू शकलो नाही. मात्र कॉलेज सुटल्यावर मी क्लासरुम मधून बाहेर येत होतो तेव्हा तिने मला पुन्हा हाक मारली आणि आणखी एक चिट्ठी दिली. त्या चिट्ठी मध्ये तिने तिचे प्रोफाइल लिहुन दिले होते.
मी ती चिट्ठी वाचून ती प्रोफाइल माझ्या मोबाइलवरून सर्च केली आणि तिला लगेच रिक्वेस्ट सेन्ड केली. तिनेही रिक्वेस्ट 10 मिनीटांच्या आत रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. नंतर आम्ही फ्रेंडस् म्हणून बोलू लागलो. मी तिच्या सोबत 2-3 दिवस फ्रैंड म्हणून बोललो.

चौथ्या दिवशी मी तिला पुन्हा विचारले , की तुझे माझ्यावर प्रेम आहे का नाही ? ती मला म्हणाली मला विचार करायला थोडा वेळ हवा. मी तिला विचारले,”किती वेळ हवा ?” ती मला म्हणाली, ‘मी तुला 2 दिवसात विचार करून सांगते’. पण तिने 2 दिवस न घेता त्याच दिवशी माझ्या प्रेमाचा स्वीकार केला.

मग आम्ही दोघे प्रेमाच्या गोष्टी बोलू लागलो. रात्रभर चँट करायचो. रात्रभर विडीओ कॉल वर बोलायचो. सकाळी कॉलेजला आल्यावर एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालुन बघत बसायचो. ती एक दिवस कॉलेजला नाही तर मला करमत नसायचं.

एक दिवस असा होता की त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि मी तिला गिफ्ट म्हणून एक भरगच्छ मिठी मागितली होती. पण नेमकं त्याच दिवशी मी काही कारणामुळे कॉलेजला जाऊ शकलो नाही आणि ती भेट राहिली.
पण त्याच्या पुढल्या दिवशी मी कॉलेजला गेल्यानंतर तिने मला बर्थडे विशेस दिल्या आणि माझ्या हाताच्या बोटात एक अंगठी ( रिंग ) घातली. आणि एक गोड अशी “डेअरी मिल्क” दिली.

नंतर आमच्या अशा भेटी खुप वेळा झाल्या. अशा भेटीत एक-दोन वेळा मी तिला किस केलं. आमच्या कॉलेजचा शेवटचा आठवडा ( लास्ट विक ) चालू होत त्यामुळे आम्ही रोजच कॉलेजमध्ये लवकर यायचो आणि गप्पा मारत बसायचो .

आमचं कॉलेज संपल. मी एका एनिमिनेशन इंडस्ट्रीत जॉब ला लागलो. पण मला तिच्या विना करमत नसायचं. मी तिला माझ्या बद्दल तिच्या घरच्यांना सांग म्हणालो ती म्हणाली मला खुप भिती वाटते. मग मीच एके दिवशी तिच्या घरी गेलो आणि किरणच्या वडिलांना किरणचा हात मागितला. पहिल्यांदा त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. पण शेवटी किरण च्या हट्टापुढे किरणच्या घरचे लग्नाला तयार झाले.

आम्ही लग्न केले. लग्नानंतर आम्हांला एक क्युट मुलगा झाला. आम्ही त्याचे नाव “किरदार” ठेवले. त्या मुलासोबत आम्ही खुप खुश आहोत आणि आमचा संसारही खुप आनंदाचा चालू आहे. आम्ही दोघे आमच्या संसारामध्यो खूप सुखी आहोत.

-कादर आत्तार

कादर आणि किरण ची प्रेम कथा अशाच प्रकारच्या लव स्टोरी सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

❤️इच्छेविरुद्ध प्रेम❤️एक अप्रतिम प्रेमकहाणी
❤️प्रेम❤️एक खरी प्रेम कथा
❤️प्रेम करावे तर असे❤️प्रेम विवाह
❤️एक प्रेमकथा अशीही❤️वेड्या मना
❤️एक स्वप्नप्रेम❤️मृत्युनंतरचं प्रेम

1 thought on “कादर आणि किरण ची प्रेम कथा- Marathi Love Story”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.