Emotional Marathi Story-मित्रांनो समाजात आपल्याला स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात. कधी मुलगी, कधी आई, कधी बहीण तर कधी बायको, तर कधी आजी वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण पहात असतो.सहनशीलता, त्याग, समर्पण आणि प्रेम ही वृत्ती मुळातच स्त्रियांमध्ये बगायला मिळते.
आज आपण अशीच एका स्त्री ची कहाणी बघणार आहोत.अशी एक स्त्री जिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटावर मात करून ते सत्यात उतरवले.ते स्वप्न होते आई होण्याचे.ही कथा एकूण तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतील.
एका शहरात एक दांपत्य राहत होते. अनेक वर्ष लग्नाला होतात पण त्यांना मूल होतं नाही. त्यांना आई बाबा व्हायचे होते.अनेक वेगवेगळे उपाय करतात, डॉक्टरांचे सल्ले घेतात, औषध उपचार करतात पण त्याचा काहिच उपयोग होतं नाही.तरी सुद्धा ते दोघे हार मानत नाहीत आपले प्रयत्न सोडत नाहीत आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते.
ते दोघे आई बाबा होनार आहेत हे त्यांना समजते.त्या दोघांचा आनंद गगनात मावत नाही परंतु त्या होणाऱ्या आईच्या अन्नशयावर एक मोठा ट्यूमर असतो तो गर्भधारणे नंतर हळू हळू वितळू लागला आणि सर्वकाही व्यवस्थित होतं होते.बाळाची वाढ सुद्धा चांगली होतं असल्याची डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतात.बघता बघता नऊ महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ येते.तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात तिचा नवराही तिच्या सोबत असतो.
डॉक्टरांनी सिजीरिअन करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते. डॉक्टर त्या बाळाला तिच्या जवळ नेतात तिला दाखवतात बाळाला ती डोळे भरून बाळाला बघते. परंतु तिची अचानक तब्बेत बिघडते. तिला काय होतय हे तिला समझत नाही.ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडले . ते दृश्य पाहून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करायचा कारण इकढे नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेली होती.
हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही कारण ते डॉक्टर रोज प्रसूती करते वेळी देवा कडे साकडं घालत की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे.मात्र आज काही भलतेचं घडले होते हे पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले होते.आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात. ते दृश्य खूप रडवणारे होते.
मित्रांनो असे दुःख कोणाच्याचं वाट्याला येऊ नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
-पूजा भोसले(मला आई व्हायचंय)
अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी (Emotional Marathi Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा
Also Read Emotional Marathi Story