प्रेमाचा खेळ, तुझ्या प्रेमाने मला मारले  | Marathi Love Story


माझे जीवन एक कोडे आहे आणि मृत्यू माझा मित्र आहे.मला तुझ्या या सुंदर जगात राहायचे नाही जिथे प्रेम हे विषापेक्षा सुद्धा विषारी आहे.ही कहाणी ऐकून तुम्हाला सुद्धा अक्षरशः अश्रू आणणार होतील.प्रत्येकाला प्रेमाने नियंत्रित करता येते पण मृत्यूला नाही. रोहन अबोलीला बघत होता तेव्हा त्याला पाठीमागून कुणीतरी धक्का दिला पाठीमागे वळून बघतो आणि बोलतो काय काम आहे. तो अनोळखी माणूस त्याच्याकडे पाणी मागतो रोहन त्याला वरून खाली पर्यंत पाहतो आणि त्याला पाणी आणून देतो पण तो पाणी पिण्यास नकार देतो रोहनला राग येतो तो बोलतो हे काय चाललंय मी तर तुझ्यासाठीच पाणी आणलं आहे.

तुम्हाला माझं बोलन ऐकून तुम्हाला जर तहान लागली असेल तर तुम्ही पाणी प्या साहेब रोहन बोलतो तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय आहे माझं नाव साहेब नाही माझं नाव रोहन आहे. तो बोलतो माझं नाव क्रिश आहे मी तुम्हाला वहिनी बद्दल सांगायला आलो आहे जी तुम्हाला साहेब बोलते रोहन बोलतो कोण वहिनी क्रिश बोलतो आता तुम्ही जिला बघताय ना तीच रोहन बोलतो कोण अबोली क्रिश बोलतो हो अबोलीच ती तुमच्याबद्दल दररोज बोलत असते रोहन बोलतो सांग ना मला ती माझ्याबद्दल काय बोलते.

तेवढ्यात पाठीमागून आई आवाज देते कोण आहे बाळा रोहन बोलतो आई मित्र आहे आई बोलते मग बाहेर का उभा आहेस बोलव ना त्याला रोहन कृष्णा आत बोलवतो तेव्हा क्रिश आईच्या पाया पडतो आई बोलते काय करायलास बाळा क्रिश बोलतो आईचा आशीर्वाद खूप मोलाचा असतो.तोच आशीर्वाद मला हवा आहे आईला त्याचं बोलणं खूप आवडतं ती त्याला अनेक आशीर्वाद देते घरात रोहन आई आणि विलास काका असतात त्या सगळ्यांचं मन काही वेळातच क्रिश जिंकून घेतो.

रोहन तीन वर्ष अबोलीला काहीच बोलू शकला नव्हता तेच बडबड्या क्रिशने काही दिवसातच अबोली आणि रोहनचे लग्न ठरवलं होतं. क्रिश अबोलीला ओळखत सुद्धा नव्हता लग्नाच्या दिवशी रोहनने क्रिशला लग्नाला थांबाण्यासाठी सांगितलं पण तो थांबतच नव्हता मग घरच्यांनी लग्नाला थांबण्यासाठी जबरदस्ती केली म्हणून क्रिश लग्नाला थांबला.

दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिशच्या छातीमध्ये खूप दुखत होतं आई रोहनला उठवते दररोज हसत खेळत असणाऱ्या क्रिशला आज काय झाला आहे कळतच नव्हतं त्याला बोलायला सुद्धा येत नव्हतं खूप मुश्किलीने तो खिशातली एक चिठ्ठी काढतो आणि रोहनच्या हातात येतो आणि तो तिथेच बेशुद्ध होतो. त्या चिठ्ठी मध्ये एक ऍड्रेस होता पण रोहन त्या ऍड्रेसवर न नेता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करतात डॉक्टर बोलतात क्रिश काही महिन्यांचाच पाहूणा आहे.

रोहन बोलतो काही महिन्यांचा म्हणजे काय झाला आहे त्याला डॉक्टर होतात त्याच्या हृदयाच्या साईटला गोळी लागली आहे आणि ती काढणं खूप मुश्कील आहे.रोहन बोलतो डॉक्टर प्लीज काहीतरी करा पण माझ्या मित्राला क्रिशला वाचवा.डॉक्टर बोलतात माझ्या हातात काही नाही सगळं काही देवाच्या हातात आहे.

रोहन बोलतो डॉक्टर प्लीज यातलं काहीच क्रिशला सांगू नका डॉक्टर बोलतात त्याला सगळं काही माहिती आहे तुम्ही या माझ्यासोबत आत मध्ये क्रिश डॉक्टरांना आत आलेल बघून उठून बसतो डॉक्टर बोलतात अरे तुम्ही झोपा तुम्ही का उठताय क्रिश बोलतो डॉक्टर तर देवासारखे असतात आणि मी त्यांच्यापुढे झोपून राहू हे बरं दिसत नाही. अरे रोहन तू कधी आलास त्याचं हे बोलणं ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी येत आणि त्याला घट्ट मिठी मारतो.

अरे तुला रडायला काय झालं असा रडू नको बघ डॉक्टर आहेत ना हे देवासारखे आहेत. बडबडा क्रिश डॉक्टरांच सुद्धा मन जिंकून घेतो. रोहन क्रिश ला डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घेऊन येतो पण कुणालाच क्रिशबद्दल काहीच सांगत नाही.

कारण घरी जर सगळ्यांना समजलं असतं तर सगळ्यांना खूप वाईट वाटलं असतं विलास काका तर जिवंतणीचं मरण यातना भोगले असते. क्रिश घरातल्या सगळ्यांचा खूप लाडका मुलगा झाला होता तो सगळ्यांची काळजी घ्यायचा विलास काकांना तर खूप हसवत असायचा.आईला स्वयंपाक घरात मदत करायचा दिवसभर आपली बडबड बडबड त्याची चालूच असायची. क्रिशने सगळ्यांची अगदी मनापासून मन जिंकली होती. एक दिवस डॉक्टर आपल्या पत्नीला घेऊन क्रिशला भेटायला घरी आले क्रिशला खूप आनंद झाला आईसाहेब तुम्ही आज चक्क आमच्या घरी तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून घेऊन येतो डॉक्टरांची पत्नी बोलते हा क्रिश आहे ना डॉक्टर बोलतात हो हाच क्रिश आहे.

डॉक्टर आणि डॉक्टरांची पत्नी सगळ्यांना भेटतात क्रिश थोड्याच वेळात काहीतरी स्पेशल असं खायला करून घेऊन येतो डॉक्टर आणि डॉक्टरांची पत्नी सगळ्यांना भेटून निघून जातात.आईच्या विनंतीला मान देऊन क्रिश स्वतःबद्दल सगळं खरं सांगून टाकतो माझे आई वडील लहानपणीच मला सोडून देवाघरी गेले त्यानंतर माझ्या काका काकींनीच मला सांभाळलं त्यानंतर प्रॉपर्टी मध्ये मी हक्क कुठल्याही प्रकारचा मागायला नको म्हणून त्यांनी मला घराबाहेर काढलं एवढीच माझी कहाणी आहे.आई त्याच्यासाठी वरची खोली साफ करून देते आणि त्याला सांगते तू आता आमच्या जवळच रहा क्रिश बोलतो ठीक आहे मी राहायला तयार आहे पण एका अटीवर मी जेव्हा नसेल त्यावेळेस माझ्या खोलीत कुणी सुद्धा जाणार नाही पण एक दिवस क्रिश नसतांना रोहन त्याच्या खोलीमध्ये जातो.

त्याच्या खोलीमध्ये टेबलवर एक कॅसेट असते तू ती कॅसेट उचलतो आणि टेप मध्ये प्ले करतो कॅसेट प्ले झाल्यावर एका मुलीच्या हसण्याचा आवाज असतो. रोहन क्रिशला विचारतो हा कुठल्या मुलीचा आवाज आहे क्रिश काहीच बोलत नाही एक दिवस फिरत फिरत ते दोघेजण एका मंदिरात जातात तेव्हा क्रिश देवाकडे एकच मागणं मागतो देवा माझ्या हातून कोणाचे सुद्धा मन दुखावले जाऊ नये. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी माझ्यामुळे हास्य आले पाहिजेत कोणी सुद्धा दुःखी नाही राहिला पाहिजेत असा मला आशीर्वाद दे देवा म्हणून क्रिश देवाकडे मागणं मागतो.

रोहन त्या कॅसेट मधल्या मुलीचा आवाज कुणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. रोहनला त्या मुलगीचा नंबर मिळतो त्या मुलगीचे नाव प्रियांका असते तिचं लग्न झालेलं असतं प्रियंकाला रोहन फोन करतो प्रियांकाचे वडील फोन उचलतात मी क्रिशचा मित्र रोहन बोलतोय मला क्रिश बद्दल जाणून घ्यायच आहे.प्रियंका चे वडील बोलतात तुम्ही प्रियांकालाच विचारा रोहन बोलतो पण प्रियंकाचा तर लग्न झालेला आहे ना प्रियंका चे वडील म्हणतात लग्न झालेलं होतं पण तिने केलेल्या चुकीची शिक्षा तिला मिळाली आहे.

प्रियांका फोन घेते आणि बोलते मला क्रिश कसा आहे हे विचारायचा अधिकार नाही आहे पण तरीही विचारते क्रिश कसा आहे तो बरा आहे ना. रोहन बोलतो मला क्रिश बद्दल जाणून घ्यायचा आहे तुम्ही मला सांगू शकाल का प्रियांका सांगायला सुरुवात करते क्रिश फेसबुक वर खूप छान छान शायरी लिहित होता मला त्या खूप आवडायच्या मी त्या शायरी घेऊन माझ्या मित्रांमध्ये पोस्ट ते करायची.

क्रिस्त प्रत्येक शायरीला मी कमेंट करत होते आणि त्याचा सुद्धा मला रिप्लाय यायचा हळूहळू आमच्यात मैत्री निर्माण झाली होती मी नेहमीच त्याची मज्जा मस्करी करायची आम्ही कितीतरी गप्पा मारायचो कधीकधी चेष्टेत मी त्याला आय लव यू सुद्धा लिहायची त्याला माझा आवाज खूप आवडायचा पण माझं अंकुश वर प्रेम होतं आणि अंकुशचं सुद्धा माझ्यावर क्रिशने ही चेष्टा मस्करी सिरीयसली घेतले आणि त्याचं माझ्यावर केव्हा प्रेम जडलं हे मलाच कळाले नाही.

एक दिवस माझा नेट पॅक संपला होता क्रिशच मेसेज आला होता तो मी डिलीट मारायला विसरले आणि तो मेसेज अंकुशने ओपन करून पाहिला त्याला खूप राग आला.अंकुश पोलीस खात्यात काम करत होता त्याने क्रिशला माझ्या आयडीवरून मेसेज केला मला तुला भेटायचं आहे आणि तू मला भेटायला ये म्हणून क्रिश मला भेटायला आला तेव्हा अंकुशच्या सांगण्यावरून मी क्रिशला गोळी मारली माझा नाईलाज होता नंतर अंकुशने सगळं काही सांभाळून घेतले.

क्रिश च्या समोरच आमच्या दोघांचं लग्न झालं रोहन बोलतो क्रिश जास्त महिने जगू नाही शकत काही महिनेच तो आपल्यामध्ये आहे असं प्रियांकाला सांगतो प्रियांकाला हे ऐकता आज खूप धक्का बसतो ती खूप रडायला लागते रोहन बोलतो तू आता इकडे कशी काय तुझं तर लग्न झालं होतं ना.प्रियंका बोलते अंकुश खूप संशयी होता त्याला आणखीन एका माणसावर असाचं संशय झाला होता त्याला सुद्धा त्याने मला मारायला सांगितलं मी नाही बोलले म्हणून त्यांने माझाच एक्सीडेंट केला.

रोहनला क्रिशच्या पावलांचा आवाज येतो रोहन काही न बोलता फोन ठेवतो. रोहन क्रिशला म्हणतो रात्री तू झोपेत प्रियंकाच्या लग्नाबद्दल काहीतरी बोलत होतास ही प्रियांका कोण आहे क्रिश हसतो आणि काहीच बोलत नाही रोहन बोलतो असा किती दिवस एकटाच दुःख सहन करणार आहेस दुःख वाटल्याने ते हलकं होतं मन मोकळं कर क्रिश बोलतो नको ते माझ्याजवळ एकट्या जवळच असलेलं बरं याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे तुला माहिती आहे या जगात आणि माझ्यात खूप फरक आहे सगळेजण दुःख मिळाल्यावर लगेच रडायला लागतात पण माझं जरा वेगळ आहे मला जेवढं जास्त दुःख मिळेल तितकाच माझ्या चेहऱ्यावर आनंद येतो.माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून दुःख सुद्धा पळून जातं दुःख बोलतं मी इथे कसं काय चुकून आलो.

दुःखाशिवाय जगण्याला काय अर्थ आहे आणि मृत्यूशिवाय जीवन तरी काय आहे तेंव्हा क्रिश च्या छातीत खूप जोराची कळ येते रोहन डॉक्टरांना बोलवतो सगळेजण मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत असतात क्रिशच तळमळन बघून रोहनला काही सुचत नाही की काय करावं क्रिशची अवस्था बघून आई विलास काका अबोली सगळेजण रडत असतात रोहनला काही सुचत नाही रोहन मंदिरात निघून जातो आणि तिथल्या पुजाऱ्याला सगळी घडलेली हकीकत सांगेत पुजारी पूजा सुरू करतात. इकडे क्रिश मृत्यूशी झुंज देत असतो परत परत रोहनला बोलवत होता.

तो माझ्याशिवाय कसा राहणार मला शेवटची एकदा माझी कॅसेट ऐकायची आहे तो शेवटचा प्रियांकाचा आवाज ऐकतो. रोहन प्रसाद घेऊन येतो तेव्हा क्रिश त्याला सोडून एका वेगळ्या दुनियेत गेलेला असतो देवाकडे रोहनला ते सहन होत नाही तो खूप रडायला लागतो मोठमोठ्याने ओरडायला लागतो क्रिश तू मला असं सोडून जाऊ नाही शकत तू का गेलास मला सोडून तेव्हा आवाज येतो साहेब सगळ्यांचे लक्ष क्रिश कडे जातं पण त्या टेप मधून आवाज येत होता.साहेब तू रडायला लागलास काय रडू नकोस या मातीत मिळणाऱ्या शरीरावर प्रेम करू नकोस माझ्या आत्म्यावर प्रेम कर ज्याला कोणी सुद्धा मारू नाही शकत तु या जगातल्या लोकांप्रमाणे आहेस ज्यांना दुःख मिळाल्यावर लगेच रडतात.

अजून पण तू रडायला लागला आहेस का माझ्या मित्राला मी असं रडताना नाही बघू शकत मला जाऊ दे मला जायलाच पाहिजे मला जाण्याची परमिशन दे या जगात जो माणूस जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस जावेच लागते.क्रिशला माहिती होतं की मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत म्हणून त्यांन माझ्याकडून वचन घेतलं होतं. मला देवाला विचारायचा आहे देवा तू प्रेम का बनवलं आहेस प्रेम बनवलं पण का खोट्या लोकांना पाठवलं आहेस मित्रांनो तुम्हाला आजची कहाणी जर आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि जर तुमच्याकडे अशीच कहाणी असेल तर तुम्ही आम्हाला पाठवून सुद्धा शकता भेटूया पुढच्या आणखीन एक कहानी मध्ये तोपर्यंत धन्यवाद

-पूजा भोसले (प्रेमाचा खेळ, तुझ्या प्रेमाने मला मारले)

अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी ( Marathi Love Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा

Also Read Marathi Love Story

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.