एका जिद्दी मुलीची गोष्ट -आज आपण अशी एक कथा बघणार आहोत जी आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवेल.
एका गावात मध्यमवर्गीय कुटुंबात एक मुलगी राहत असते. तिचे आई बाबा दररोज कामाला जायचे. पाठीमागे तिला दोन बहिणी पण होत्या. शिक्षणा सोबतच ती घरातली सुद्धा काम करायची. खूप तरबेज मुलगी होती. तिला खूप शिकून आपल्या आई बाबांना चांगले आयुष्य द्यायचे होते. त्यासाठी ती नेहमीच प्रयत्न करायची.
असेच काही वर्षे निघून जातात आणि दहावीला ती चांगले मार्क घेते. नंतर ती आकरावी बारावी ससान्स ला ऍडमिशन घेते. बारावी नंतर तिला खूप शिकायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. तिला स्थळे येतात तिला एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते. स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. नाईलाजात्सव लग्न करावे लागते. पण सासरी तिला पुढे शिकायला बंदी घातली जाते.तिचे शिक्षण अर्धवतच रहते इच्छा असूनही ती पुढे शिकू शकत नाही. या गोष्टीची तिला नेहमीच खंत खात रहते.
तिला खूप काही गोष्टी करायला आवडायच्या दररोज नवीन प्रयोग करत असायची. तिची जिद्द तिला स्वस्त बसू देत नव्हती. तिला नेहमी बोलले जायचे घरात बसून कायं काम आहे. एवढं शिकून तुझा कायं उपयोग पण तिचा नाईलाज होता गप्प ऐकूण घेण्या शिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता.
ति नेहमी छोटी मोठी कामे करायची एक दिवस तिला समजले की ऑनलाईन काम करून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो.
मग ती ऑनलाईन कायं काम आहे ते कसं करायचं हे शिकून घेते.असेच काही दिवस निघून जातात आणि ती आपल्या ऑनलाईन कामामध्ये हळू हळू पुढे जात होती. तिचे मन आता त्या कामात खूप रमले होते.तिला ऑनलाईन अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या जे नेहमी तिला प्रोत्साहन देतात.तिला काहीही करून आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचे होते.तिला नेहमी दुसऱ्यांची मदत करायला खूप आवडायचे कारण तिला तिच्या सारख्या अनेक लोकांना आपल्या बरोबर सोबत पुढे आणायचे होते.
दररोज तिला नवं नवीन संकटाना सामोरे जावे लागत असतं पण ती न घाबरता,प्रत्येक संकटावर मात करत पुढे जाते. आणि बोलणाऱ्या सगळ्यांची तोंडे बंद करते ती दररोज निःस्वार्थ सगळ्यांची मदत करायची.
असेच काही दिवस निघून जातात आणि हळू हळू ती आपल्या स्वप्नांच्या जवळ जात असते. दिवस रात्र मेहनत करते थांबत नाही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती खूप मेहनत करते आणि एक दिवस असा येतो की तिच्या कष्टाचे फळ मिळते.आणि ती उंच गगनात भरारी घेते आणि तिचे स्वप्न पूर्ण होते आपल्या आई बाबांना चांगले सुखाचे आयुष्य देते. मुलगी असूनही ती कधी आपली जिद्द सोडत नाही. संकटाशी नेहमी दोन हाथ करते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लग्न झालंय घरचे नोकरी करू देत नाहीत, पुढचे शिक्षण घेता येत नाही म्हणून ती कधी रडत बसत नाही हिमतीने आणि धडसाने प्रत्येक संकटाना सामोरे जाते.आणि सगळ्यांनाच चांगले जीवन जगायला प्रोत्साहन देते. खरं तर सलाम तिच्या या जिद्धीला, तिच्या निःस्वार्थ मदतीला कारण तिला जे ज्ञान मिळालं ते तिने स्वतः पुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांना मदत केली. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद वाटला.
म्हणूनचं आज मला या कथेतून एक गोष्ट सांगायची आहे की केंव्हाही हार मानून रडत बसू नका, प्रत्येक संकटावर मात करून जिद्धीने सामोरे जा. प्रयत्न केंव्हाच सोडू नका. एकदा हाराल, दोनदा हाराल पण तिसऱ्यांदा तरी यश नक्की मिळेलखचुन न जाता आयुष्याशी दोन हाथ करायला शिका.आपल्या आयष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आणि मग बघा कायं जादू होते ते…
-पूजा भोसले
अशाच प्रकारच्या मराठी स्टोरी (Inspirational Marathi Story) सामग्रीसाठी marathistory.in फॉलो करा
Also Read Inspirational Marathi Story
Zindagi hamesha unhi logo ka imtihaan leti hai jinke pass use dene ka hunar ho… Good story…👍
Thank you so much 🙏